कोंकणआपला जिल्हा

सिंधुदुर्गवासियांनी केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे जिल्हा झाला कोरोना मुक्त – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच एकमेव सक्रीय रुग्ण होता, तोही आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला. सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेळोवेळी केलेल्या काटेकोर कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. तत्पूर्वीच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी काटकोरपणे पावले उचलली होती. रुग्ण आढळल्यास त्यावरील उपाययोजनांबाबत खबरदारी घेण्यासाठी कोविड सेंटर्सची तयारीही ठेवण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये कणकवली, सावंतवाडी, जिल्हा रुग्णालय ओरोस येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कुडाळ येथे रिफिलिंग प्लांट उभारण्यात आले होते. त्याचबरोबर कोविड काळजी केंद्रे, कोविड आरोग्य केंद्रे यांचीही उभारणी करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. सामंत आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला जिल्हा वासियांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केले होते. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाला. आजपर्यंत एकूण 55 हजार 847 जणांची कोरोनावर मात केली आहे. कोविड लसीकरणामध्येही जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकही नव्याने रुग्ण सापडला नाही. शिवाय एकमेव सक्रीय असणारा रुग्णही मुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 08/04/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 0
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 0
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 0
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 55,847
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 1,532
6 मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 0
7 आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 57,379
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-0, 2)दोडामार्ग-0, 3)कणकवली-0, 4)कुडाळ-0, 5)मालवण-0, 6) सावंतवाडी-0, 7) वैभववाडी- 0,
8) वेंगुर्ला- 0, 9) जिल्ह्याबाहेरील- 0.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-6942, 2)दोडामार्ग -3220, 3)कणकवली -10609, 4)कुडाळ -11863, 5)मालवण -8253,
6) सावंतवाडी-8504, 7) वैभववाडी – 2562, 8) वेंगुर्ला -5107, 9) जिल्ह्याबाहेरील – 319.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड -0, 2) दोडामार्ग -0, 3) कणकवली -0, 4) कुडाळ -0, 5) मालवण -0, 6)सावंतवाडी -0,
7) वैभववाडी – 0, 8) वेंगुर्ला – 0, 9) जिल्ह्याबाहेरील – 0.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड – 185, 2) दोडामार्ग – 47, 3) कणकवली – 321, 4) कुडाळ – 254, 5) मालवण – 300,
6) सावंतवाडी – 217, 7) वैभववाडी – 83 , 8) वेंगुर्ला – 116, 9) जिल्ह्या बाहेरील – 9,
आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड – 0, 2) दोडामार्ग – 0, 3) कणकवली – 0, 4) कुडाळ – 0 , 5) मालवण – 0, 6) सावंतवाडी – 0,
7) वैभववाडी – 0, 8) वेंगुर्ला – 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 0.
टेस्ट रिपोर्ट्स
(फेर तपासणी सहित) आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे 14
एकूण 337,520
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 41,168
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 18
एकूण 293,063
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 16,423
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -0, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण -0
आजचे कोरोनामुक्त – 1
टिप – मागील 24 तासातील 0 मृत्यू आहे.
* तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!