ब्रेकिंग

दिक्षा प्रमोद नाईक हिला सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

कुडाळ- नुकत्याच संपन्न झालेल्या मराठवाडा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये सिंधुदुर्गातील स्नेहांश एन्टरटेन्मेंट निर्मित आणि श्री. शेखर गवस दिग्दर्शित झुलबी 2 लघुपटातील बायग्याची भूमिका करणारी कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळविलाया अगोदर दिक्षाला झुलबी शॉर्टफिल्मसाठी संकल्प शॉर्टफिल्म व मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे.

तिच्या या यशामध्ये श्री. शेखर गवस, श्री. रवि कुडाळकर, श्री. शेखर सातोस्कर तिचे आईवडील आणि संपूर्ण स्नेहांश एन्टरटेन्मेंट टीमचे खूप मोलाचे योगदान आहे.दिक्षा ही कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी असून ती मूळची गोळवण तालुका मालवण येथील असून सध्या कुडाळ- पिंगुळी येथे राहते. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून भरपूर कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!