कुरार येथे लसीकरण केंद्राचे लोकार्पण;आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई,दि.१९-दिंडोशी मालाड पूर्व कुरार येथील लोकसंख्या जास्त आहे. येथे लसीकरण केंद्र नसल्याने येथील नागरिकांना लस घेण्यासाठी नेस्को कोविड सेंटरला व अन्यत्र जावे लागत होते.कुरार, आप्पापाडा येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे प्रवक्ते, स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे केली होती. या प्रकरणी मुंबईचे उपमहापौर अँड.सुहास वाडकर व प्रभाग क्रमांक 38 चे स्थानिक नगरसेवक आत्माराम चाचे,नगरसेविका विजया विष्णू सावंत यांनी पालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला होता. आणि काल रविवार दुपारी आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले.
दिंडोशी येथील कुरार, आप्पा पाडा, क्रांतीनगर येथील राहणाऱ्या लाखो नागरिकांना या लसीकरण केंद्राचा लाभ होणार आहे. येथे रोज 300 नागरिकांचे लसीकरण होणार असून येथे नागरिकांना बसण्याची व्यवस्था, लस घेतल्यानंतर विश्रांती कक्ष अशी सुविधा आहे.कोरोना पासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी असे आवाहन आमदार सुनील प्रभू यांनी केले आहे.
या लसीकरण केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतूजा बारस्कर , कार्यकारी अभियंता शिवशानत डोके यांनी खूप मेहनत घेतली.
सदर उदघाटन प्रसंगी नगरसेवक तुळशीराम शिंदे, विधानसभा संघटक विष्णू सावंत व प्रशांत कदम, पूजा चौहान, प्रदीप निकम, सुनिल गुजर,शाखाप्रमुख विजय गावडे, रमेश कळंबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.