ब्रेकिंग

मुलांसाठी गॅसचे फुगे घेताय? सावधान ! सिलेंडरचा कधीही होऊ शकतो स्फोट

चिपळूणमध्ये फुगे फुगविणार्‍या सिलिंडरचा स्फोट, एक जण जखमी

चिपळूण – चिपळूण शहरातील गोवळकोट भागात फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घडलेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे.सध्या त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार काल सायंकाळी उशिरा घडला.

चिपळूणमधील गोवळकोट परिसरात काही परप्रांतीय राहतात. मुलांच्या खेळण्यासाठी विविध रंगांचे फुगे फुगवून ते विक्री करण्याचा व्यवसाय करतात. फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. त्यापैकी एका गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह तुटल्याने सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.या स्फोटात फुगे विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.

हा स्फोट एवढा मोठा होता की पत्र्याचे शेडही फाडून सिलिंडर इमारतीच्या तिसर्‍या मजल्यापर्यंतवर उडाला. या स्फोटामुळे आजूबाजूला घबराट निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व परिसराची पाहणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!