अवघ्या १० वर्षांची मुलगी आहे कोट्यावधींची मालकिण,वाचा कोण आहे ती आणि काय करते ती?

अवघ्या दहा वर्षाचं मुलं काय करू शकतं? असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला, तर तुम्ही म्हणाल खोडकरपणा.पण हे सर्व बाजूला सारत अवघ्या दहा वर्षाची एक मुलगी चक्क कोट्यावधी रूपयांची मालकिण बनली आहे.तेही स्वत: च्या कर्तृत्वावर.वाटलं ना आश्चर्य?.आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात एक मजेशीर गोष्ट सांगणार आहोत.
पिक्सी कर्टिस ही अवघ्या 10 वर्षांची मुलगी आहे. पण एवढ्या कमी वयात ही मुलगी दोन कंपन्यांची मालक आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. ती ऑस्ट्रेलियाची आहे. तिनं आपली आई रॉक्सी जेसेन्को यांच्या मदतीनं एक कंपनी सुरू केली.
https://www.instagram.com/p/CYfoAFQJVAb/?utm_source=ig_web_copy_link
Pixie’s Fidgets असं या कंपनीचं नाव आहे. गेल्या वर्षी ही कंपनी सुरू करण्यात आली. ती या कंपनीची सीईओ आहे. ही खेळणी विकणारी कंपनी आहे आणि लोकांना त्यांचं काम खूप आवडलं आहे. जेव्हा त्यांनी कंपनी सुरू केली, तेव्हा पहिल्या ४८ तासांत त्यांची सर्व खेळणी विकली गेली.
विशेष म्हणजे ती स्वत:चं व्हिडीओ बनवून याचं प्रमोशन करते.सध्या ती ८१ कोटी रूपयांची मालकिण असून तिने तीच्या कमाईतून ४८ कोटी रूपयांचं एक घरही खरेदी केलं आहे.