ब्रेकिंग
डीजे बंद केला या रागातून थेट पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड, बुलढाण्यातल्या शेगावमधला प्रकार

बुलढाणा:-बुलढाणा जिल्ह्यांमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. डीजेच्या गाण्यावर नाचून दिले नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये घुसून तरुणांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव पोलिसांना रात्री एकच्या सुमारास गावांमध्ये डीजे सुरू असल्याची तक्रार मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डीजे बंद करण्यास सांगितले. दरम्यान डीजे बंद केला या रागातून डीजेसमोर नाचणाऱ्या जवळपास ३० तरुणांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात पोलीस स्टेशनची तोडफोड केली आहे.
या तोडफोडीत पोलीस स्टेशन चा मोठं आर्थिक नुकसान झाले असून यात पोलिस स्टेशनच्या काचा, फर्निचर या गोष्टींची तोडफोड झाली आहे. सध्या पोलीस या तरुणांचा शोध घेत असून या तरुणांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.