पानिपतकार विश्वास पाटील यांचा उपाध्यक्ष- महाराष्ट्र विधानसभा अण्णा बनसोडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार संपन्न

मुंबई : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा याच्या नियोजित अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार आज दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. शताब्दी पूर्व म्हणजे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक सातारा शहरात होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार, विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे. सन १९९२ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासह असंख्य मानसन्मान मिळवणारे विश्वास पाटील हे त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, चरित्र तत्त्वज्ञान, कथासंग्रह, नाटक अशा साहित्यातील चौफेर मुसाफिर साठी प्रसिद्ध असून त्यांच्या कादंबऱ्यांची हिंदी भाषेत भाषांतरे झालेली आहेत.
अशा चतुरस्त्र लेखकाची निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होणे सातारकरांबरोबर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे अण्णा बनसोडे यांनी विशद केले. अशा कर्तुत्वान व्यक्तीच्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष यांना बनसोडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ राजा दीक्षित माजी अध्यक्ष, मराठी विश्वकोश मंडळ, उदयनराजे भोसले खासदार सातारा, शंभूराज देसाई पालकमंत्री सातारा, मकरंद पाटील मंत्री मदत पुनर्वसन, भगवान दादा वैराट अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे, नंदकुमार सावंत कोषाध्यक्ष, विनोद कुलकर्णी कार्याध्यक्ष, यांच्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास साहित्यिक कवी लेखक व रसिकांची प्रचंड गर्दी होती.