महाराष्ट्रमुंबई

विलेपार्ल्यात रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुंबई महानगर क्षेत्रातून 200 हुन अधिक रुग्ण मित्रांनी सहभाग घेतला

स्वामी विवेकानंद 161 वी जयंती युवा दिनाचे औचित्य साधून के पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण मित्र सहयोगी संस्थेने विलेपार्ले पूर्व येथील वैष्णवी बेनक्वेट हाॅल येथे रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून आयसीएमआर अनुवांशिक संशोधन केंद्र प्रमुख डॉ.शैलेश पांडे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांना पाणी अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आले. या कार्यशाळेत मुंबई महानगर क्षेत्रातून 200 हुन अधिक रुग्ण मित्रांनी सहभाग घेतला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आपल्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तसेच आरोग्य विषयक कायद्याचा अभ्यास कार्यशाळेव्दारे साक्षर करुन एक माहिती पुस्तिका जनहितार्थ प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका आपत्कालीन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी कोरोना काळातील आरोग्य विषयक व्यवस्थापनाची माहिती दिली. डाॅ.शैलेश पांडे यांनी आयसीएम आर्या संशोधन व निःशुल्क तपासण्या, दुर्मिळ आजारातील लक्षणे, उपचार पद्धतीबद्दल विश्लेषण केले.

या व्यतिरिक्त पूनम भोवर यांनी कॅन्सर पेशंट एड असोसिएशन गरजू रुग्णांसाठी करीत असलेल्या उपचार पध्दती,तपासणी,शिबीर याची माहिती दिली. प्रफुल पवार यांनी अवयव दान, प्रत्यारोपण प्रक्रियाची माहिती दिली. अमोल सावंत यांनी रक्तदान,रक्ताचे घटकांची माहिती दिली. गणेश पवार व रुग्ण आराध्य पवार यांनी दुर्मिळ आजारांसाठी आवश्यक मदत लागल्यास संपर्कात राहण्याचे आवाहन केले. धनंजय पवार यांनी धर्मादाय रुग्णालयात (दुर्धर व निर्धन गट) मदतीसाठी संपर्कात राहून उपचार मिळवून देण्यासाठीच्या सूचना केल्या.

निरंजन आहेर व श्रध्दा बनसोडे यांनी प्रभावी सूत्रसंचालन करुन रुग्ण मित्रांना विविध वकृत्वाच्या कौशल्यातून संदर्भ देत वातावरण आनंदी ठेवले. के-पूर्व सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू, आयोजक संदीप खामकर, गौतम पाईकराव, पंकज नाईक, किरण गिरकर, रमेश चव्हाण, चारुदत्त पावसकर, हर्षल जाधव, श्रुती साडविलकर आणि के-पूर्व विभागातील आरोग्य सेविका, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अंधेरी-जोगेश्वरी पोलिस ठाणे रुग्ण मित्रशी संलग्न विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्या नियोजनबध्द व्यवस्थापनातून रूग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेची संकल्पना केलेले रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!