ब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

मुंबई :  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वक्तव्य केले. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. गृहमंत्री म्हणून उत्तमपणे देशात सुरक्षा राखण्याचे काम अमित शहांच्या नेतृत्वात होतेय. परंतु आपल्यावर टीका झाली म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाही. गृहमंत्र्यांविषयी पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच आले आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

रामदास कदम यांनी केलेल्या विधानावर आ. दरेकर म्हणाले कि, रामदास कदम हे उबाठा सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेता म्हणून काम करताहेत आणि स्वाभाविकपणे त्यातून त्यांची मागणी आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा दिली गेली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या स्मारकाविषयी वाद होऊ नये असे मला वाटते. स्मारकासाठी जी जागा दिली त्यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आताही सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्याविषयी महाराष्ट्रातील सर्व पक्षांना वेगळा सन्मान आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना बाळासाहेबांविषयी आदर आहे. पक्षीय राजकारणात बाळासाहेबांच्या स्मारकाला ओढले जाऊ नये, असे स्पष्ट मतही दरेकरांनी मांडले.

शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, गृहमंत्र्यांवर व्यक्तिगत टीका करणे योग्य नाही. त्यांची तडीपारी का झाली याबाबत कोर्टाने, संबंधित यंत्रणांनी निकाल दिलेला आहे. गृहमंत्री म्हणून या देशहितासाठी अमित शहा यांनी घेतलेले निर्णय शरद पवारांच्या लक्षात आहेत कि नाही? गृहमंत्री म्हणून उत्तमपणे देशात सुरक्षा राखण्याचे काम अमित शहांच्या नेतृत्वात होतेय. परंतु आपल्यावर टीका झाली म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाही. अमित शहा गृहखाते योग्य पद्धतीने सांभाळत आहेत. देशाला अभिमान वाटेल असे धाडसी निर्णय ते घेताहेत. देशाला अत्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. गृहमंत्र्यांविषयी पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातून आले आहे.

मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्थेच्या बाजूनेच

आ. दरेकर म्हणाले कि, देशमुख हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री वारंवार सांगत होते कुणालाही सोडणार नाही. तशा प्रकारची कारवाई होत होती. आणखी कठोर कारवाई होईल. जे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत होते त्यांना चपराक मिळाली आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात नसते. कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. कठोर कारवाई होईल. त्या पद्धतीने आज मकोकाची कारवाई झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!