महाराष्ट्रकोंकण
ग्रामीण नागरी सुविधांबाबत बेजबाबदारपणा टाळा – किरण सामंत यांच्या सूचना

लांजा : लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय गाव भेट दौऱ्यात ग्रामीण भागातील ‘नव्या कामांसह अपूर्ण स्थितीतील विकासकामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वाला नेऊ, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी नागरिकांना देत ग्रामीण नागरी सुविधांबाबत अधिकाऱ्यांचा बेजबाबदार व दुर्लक्षपणा चालणार नाही अशा सक्त सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
ग्रामविकासावर अधिक भर देत आमदार आपल्या दारी या संकल्पनेमुळे आमदार सामंत यांनी लांजा तालुक्यातील नागरिकांची विश्वासार्हता जपल्याचे दिसून आले. स्वतः सह विविध खात्यांच्या शासकीय अधिकाऱ्याना गाव दौऱ्यात समाविष्ट करून नागरिकांच्या समस्या, अंडचणी, अपूर्ण विकासकामे जाणून घेण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.