रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग बंद, नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रत्नागिरी – रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलीय. तर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. रायगडमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी शिरल आहे. शहरातील एसटी स्थानक आणि कोळीवाडा परिसर जलमय झाला आहे. या भागात सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, मुळशी धरणातील पाणी थेट अंबा नदीच्या पात्रात दाखल झाल्यानं अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीची धोक्याची पातळी 9 मीटर एवढी असून सध्या नदी 9.20 मीटवर पोहोचली आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे.
मुसळधार पावसामुळे रोह्यात कुंडलिका नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीवर गेले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिकेने दवंडी पिटून सावधानतेचा इशारा दिला आहे. कुंडलिका नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहून लागले आहे. त्यामुळे जुना पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. बॅरीगेटींग करून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.