क्रीडा

वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून १२५ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी एक्सवरून ही माहिती दिली. बक्षिसाची ही रक्कम खेळाडू , प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वाटली जाईल. काल बार्बाडोस येथे झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी २० वर्ल्डकपच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर संपूर्ण देशात क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला होता. राष्ट्रपती मुर्मू , पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानंतर बीसीसीआईने वर्ल्डकप विजेत्या संघासाठी १२५ कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली. भारतीय संघ मायदेशी परतल्यावर संघाला बक्षिसाची ही रक्कम दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!