प्रो-कबड्डी लीगचा असा घ्या आनंद, कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

क्रिडाप्रेमींंसाठी उत्सुकतेची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे प्रो-कबड्डी लीग.आगळे-वेगळे डावपेच आणि थरारक खेळीचा अनुभव प्रेक्षकांना बुधवारपासून मिळणार आहे.यंदा २ नवीन संघ या लीगचा भाग होणार आहे.
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला २२ डिसेंबर २०२१ पासून सुरूवात होणार आहे, तर २० जानेवारी २०२२ पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा न झाल्याने यंदा ती आयोजित केली जात आहे. यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होत असून, यावेळी हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.
प्रो कबड्डीचे सामने कुठे बघणार?
▪️ प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर पाहता येईल.
▪️ प्रो-कबड्डी लीगचे ऑनलाईन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर पाहू शकता.
▪️ प्रो-कबड्डी लीगमध्ये दररोज 2 ते 3 सामने वेगवेगळ्या वेळेला खेळले जातील. जिथे पहिला सामना संध्याकाळी 7:30 वाजता, दुसरा सामना 8:30 वाजता आणि तिसरा सामना रात्री 9:30 वाजता खेळवला जाईल.
‘प्रो कबड्डी लीग’चे संघ:
1) पुणेरी पलटण
2) यू मुंबा
3) यूपी योद्धा
4) दबंग दिल्ली
5) जयपूर पिंक पँथर्स
6) पटना पायरेट्स
7) गुजरात जायंट्स
8) हरियाणा स्टीलर्स
9) बंगाल वॉरियर्स
10) बंगळुरू बुल्स
11) तमिळ थलाईवाज
12) तेलुगू टायटन्स
दरम्यान, दिल्लीचे नेतृत्व करणारे अनुभवी कबड्डीपटू जोगिंदर नरवाल यांच्या कॅप्टनशीपमध्ये त्यांचा मुलगा विनय नरवालही दिल्लीसाठी खेळणार आहे. जयपूर पिंक पँथर्सचा स्टार खेळाडू धर्मराज चेरलाथन आतापर्यंत प्रो कबड्डी लीगच्या सातही हंगामात खेळला आहे. विशेष म्हणजे धर्मराज सध्या 46 वर्षांचा आहे.