समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे अनुसूचित जाती आयोगाचे आदेश
मुंबई:- एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखडे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती,असा आरोप केला होता. या खटल्यावर अनुसूचित जाती आयोगाने सुनावणी करत वानखडे यांच्या तक्रारीनुसार मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
समिर वानखडे यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग मुंबई पोलिसांना मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.मंत्री नवाब मलिक यांच्यावर आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११,४९९,५०३,५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान आर्यन खान प्रकरणामुळे वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले असून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. एनसीएससी मात्र वानखेडे यांच्या तक्रारीची चौकशी करत आहे. वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर अनुसूचित जातींना देण्यात आलेल्या आरक्षणांतर्गत आयआरएस नोकरी मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.





