बिग बॉसच्या घरात भुत पाहिलंय,राजीव अदातियाचा दावा

मुंबई- प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात सुरू असलेला शो म्हणजे बिग बॉस. हाच बिग बॉस शो सध्या भूताटकीमुळे चर्चेत आला आहे.बॉस शो १५ मध्ये सहभागी झालेला राजीव अदातिया एलिमिनेट झाल्यानंतर सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्यानं एक धक्कादायक दावाही केला आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर राजीवच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
राजीवनं बिग बॉसच्या घरात दोन वेळा लहान मुलीचं भूत पाहिल्याचा धक्कादायक दावा केला आहे.राजीव अदातियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी बिग बॉसच्या घरात २ वेळा भूत पाहिलं आहे. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि घरात झोपण्यास नकार दिला होता. त्यावेळी उमर, प्रतीक निशांत आणि मी घराच्या आतल्या भागात होतो.
अचानक मी आणि निशांत उठून उभे राहिलो कारण आम्ही बिग बॉसच्या घरात एका लहान मुलीला पाहिलं होतं. आम्ही विचार करत होतो की, एवढी लहान मुलगी बिग बॉसच्या घरात कुठून आली. ती आमच्या बाजूने निघून गेली. हे सर्व मस्करी नाही आहे. बिग बॉसच्या घरात भूत आहे. मी याला लाइव्ह फीडवरही दोन वेळा पाहिलं आहे. त्या घटनेनंतर आम्ही घाबरुन गेलो होतो. ‘असा अनुभव राजीवने शेअर केला आहे.राजीवच्या या दाव्यावर शोकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही.मात्र,राजीवचा हा दावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.