मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या रसास्वाद मंडळाचा उपक्रम

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला अवघाचि संसार” चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. एनएफडीसी -एनएफएआय यांच्या विशेष सहकार्याने रसिकाना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वा. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृहात “अवघाचि संसार” हा अजरामर चित्रपट पुन्हा पाहण्याची सुवर्णंसंधी मिळणार आहे.
 
१९६० रोजी “अवघाचि संसार ” या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन अनंत माने केले होते. त्यावेळी या चित्रपटाला रसिकांनी चांगली दाद दिली होती. या चित्रपटातील “ जे वेड मजला लागले, रूपास भाळलो मी” अशी गाणी अजरामर झाली आहेत. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर, अभिनेते रमेश देव यांनी प्रमुख भूमिका साकारली असून दामूअण्णां मालवणकर, पद्मा चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.हा चित्रपट मंडळाच्या सभासदासह सर्व रसिकाना विनामूल्य पाहता येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम आसन व्यवस्था असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!