शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, राज्यभरातील 100 शाळांना भेट देणार वरिष्ठ अधिकारी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे १०० शाळांना भेटी देण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने प्रस्तावित केला आहे. यामध्ये शासकीय यंत्रणेतील उच्च पदस्थांसोबतच वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिका-यांना सोबत घेऊन हा उपक्रम करण्याचे निर्देश जारी झाले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रधानसचिव आदींनी २००५ – २६ वा शैक्षणिक वर्षाची सुरूवात होण्याच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा नजिकच्या किसान शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम तयार करून पालक सचिवांना कळवायचे आहे.
या भेटीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता व सोयी-सुविधा यांचा आढावा घेण्यात येणार आहे. शाळेला भेट देणारे लोकप्रतिनिधी तसेच अधिका-यांनी या उपक्रमाबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य याच्याशी चर्चा करायची आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी कल कसा वाढेल याबाबत उपाययोजना सुचवणार आहेत.