दिलासादायक:मुंबईसह राज्यभरात कोरोना च्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट
मुंबई, दि. १९ : गेल्या महिनाभरापासून मुंबईत व महाराष्ट्रात सातत्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आज एकदम एक हजाराने घटली आहे. तर राज्यातील रुग्णसंख्या दहा हजाराने घटली आहे.
आज मुंबईत कोरोना चे ७,३८१ रुग्ण सापडले, तर राज्यात आज ५८,९२४ रुग्ण आढळले. राज्यात काल ६८,६३१ या विक्रमी संख्येने रुग्ण सापडले होते. त्यामुळे आजची कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक आहे. मुंबईत मृतांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असतानाच राज्यात मात्र मृतांच्या संख्येत १५० ने घट झाली आहे.
मुंबईत आज ७,३८१ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ५,८६,६९२ झाली. आज दिवसभरात ८,५८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४,८६,६२२ झाली. आज ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२,४०४ झाली. मुंबईत सध्या ८६,४१० सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.