ब्रेकिंगमुंबई

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने १५ फेब्रुवारीपर्यंत लतादीदींवरील साहित्याचे संदर्शन

दादर- गानकोकिळा  भारतरत्न लता मंगेशकर यांचे नुकतेच देहावसान झाले.लतादीदींना मानवंदना देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने त्यांच्यावरील साहित्याच्या संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न लतादीदी या स्वतः एक विद्यापीठ होत्या,त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लेखन झाले आहे.

त्यातील वैशिष्ट्यपूर्ण व निवडक साहित्य या संदर्शनात आहे. दिनांक ९ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या, दादर पूर्व येथील संदर्भ विभागात या संदर्शनाचे उद्घाटन  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या उपाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कार्याध्यक्ष शीतल करदेकर,प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे,कोषाध्यक्ष जयवंत गोलतकर,ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे , साहित्यिक अर्जुन डांगळे व प्रल्हाद जाधव, कार्यवाह उमा नाबर व उदय सावंत , कार्यकारिणी सदस्य अमेय कोंडविलकर,विनायक परब,सुनिल राणे,स्वप्निल लाखवडे,मकरंद केसरकर,अॕड.सुनिल गायकवाड आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

दिनांक १५ फेब्रुवारी पर्यंत (मंगळवार ते शनिवार सकाळी९ते संध्याकाळी ७,रविवार सकाळी ९ते दुपारी ४,सोमवारी सुट्टी)सुरू असणाऱ्या या संदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त रसिक, वाचकांनी घ्यावा असे आवाहन संदर्भ विभाग सचिव उमा नाबर यांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!