रोहित पवारांनी पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदेंना घातली अट,म्हणाले..

मुंबई – झी मराठीवर किचन कल्लाकार हा शो सुरू झाला असून सदर कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील हजेरी लावली आहे. आता किचन कल्लाकारमध्ये राजकीय खिचडी शिजणार आहे. यावेळी शोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे हजेरी लावणार आहेत. याचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे.
झी मराठीनं शेअर केलेल्या किचन कल्लाकारच्या प्रोमोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे दिसत आहेत. शोमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगल्याचेही दिसत आहे. यावेळी रोहित पवार यांनी प्रणिती शिंदे व पंकजा मुंडे यांच्यासाठी खुर्चीचा त्याग केल्याचे पाहायला मिळाले.मात्र, यावेळी त्यांना रोहित पवार म्हणाले की, ‘मी त्याग केला पण मला त्या खुर्चीसाठी तुम्ही मदत करायची आहे’.
यावेळी प्रणिती शिंदे यांना युतीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा त्या गमतीनं म्हणाल्या की, मला माझ्या वरिष्ठांशी बोलावे लागेल.त्यांच्या या एका वाक्यावर सगळीकडे हास्य पसरते. झी मराठीनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,युती होऊन खुर्ची मिळणार का ? सध्या सगळ्यांना हा भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे.