
पुणे:- राज ठाकरे यांच्या नियोजित पुणे दौऱ्या पूर्वी मनसेला धक्का देत मनसेच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.यानंतर पत्रकार परिषद घेत,’राज ठाकरेंवर माझी निस्सीम श्रद्धा आहे आणि त्यांचे नाव कायम माझ्या हृदयात कोरलेले राहील असं त्या म्हणाल्या’ होत्या. यानंतर रुपाली ठोंबरे-पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. याच दरम्यान आज रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या.रुपाली ताईंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्वागत केलं.
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …@NCPspeaks @ShivSena@INCIndia
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 16, 2021
ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत, ‘आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत हो म्हणूनच ठरलंय. या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार,असं मत रुपाली पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावरूनच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील हे स्पष्ट झालं आहे.
या ट्विटनंतर रूपाली पाटील यांचा पक्ष प्रवेश सोहळा लवकर होणार आहे,असंही बोललं जात आहे. रूपाली पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश हा मनसेला महिला चेहऱ्यासाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो,अश्याही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत.