मुंबई

महिलांच्या प्रश्नांवर घाटकोपरमध्ये निर्भय वॉक

मुंबई – महिलांच्या सुरक्षितेसाठी गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला ‘ घाटकोपर येथे निर्भय वॉक ‘ काढण्यात येणार आहे.अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने घाटकोपर मधील सामाजिक संस्था, संघटनाच्या पुढाकाराने निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायं.6.30 वाजता घाटकोपर पश्चिम,भटवाडी येथील गणेश मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून घाटकोपर पूर्व येथील रायगड चौका पर्यंत हा’ निर्भय वॉक ‘जाणार आहे.हा वॉक मुलींच्या आणि मुलांच्या सुरक्षितते साठी आणि समाजात निकोप वातावरण निर्माण होण्यासाठी, आपला विवेक जागविण्याचा आणि ‘द्वेष नको प्रेम हवे ‘असे सांगत ‘माणूस ‘ जागविण्याचा हा मार्च आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,अभिनेत्री चिन्मयी सुमीत, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य,कवी अरुण म्हात्रे,लोकशाहीर संभाजी भगत,मराठी भाषा केंद्राचे प्रा.दीपक पवार, शिवसेनेचे सचिव डॉ.संजय लाखे पाटील,शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव,काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अब्राहम रॉय मणी,काँग्रेसचे मुंबई गुजराथी सेल चे अध्यक्ष केतन शहा,शिवसेना महिला विभाग प्रमुख प्रज्ञा सकपाळ,राष्ट्रवादीचे युवा नेते ॲड.अमोल मातेले ,सुरज भोईर, आमीर काझी, शाकीर शेख,संदेश गायकवाड प्रभुती मान्यवर या ‘निर्भय वॉक’ मध्ये चालणार आहेत. घाटकोपर मधील इंडिया आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी घटक पक्षांनी या निर्भय वॉकला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे.अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शहाजी पाटोदेकर यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!