पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरेंची गैरहजेरी, राजेश टोपेंना उपस्थित राहूनही मिळाला नाही बोलण्याचा चान्स

नवी दिल्ली:- सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनबाधितांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.मागच्या २४ तासांत देशात एकूण २,४७,४१७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
याच दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आज संध्याकाळी ४.०० वाजता पार पडलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनुउपस्तिथी लाभली.मात्र,त्यांच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला हजर राहिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संध्याकाळी ४.०० वाजता व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे कोविड-१९ संसर्ग प्रतिबंध संदर्भात चर्चा केली. या ऑनलाईन बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहीती समोर आली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिले.मात्र,त्यांना या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही.बैठक संपल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.






