१२ आमदारांच्या निलंबना संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई:-विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं.दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने महत्वाची सुनावणी देत १२ आमदारांचे निलंबन रद्द केलं आहे.यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. खरं म्हणजे हा विधानसभेचा अधिकार आहे. राज्यसभेत आमचे काही खासदार निलंबित झाले, त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही. आमचे राज्यपालनियुक्त १२ आमदार दोन वर्षांपासून वाट पाहत आहेत, राज्यपालांकडे फाईल पडून आहे आणि ते काही निर्णय घेत नाहीत. हा पण त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करण्यास तयार नाही,” अशी नाराजी संजय राऊत यांनी जाहीर केली.
“मला आश्चर्य वाटतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धिंगाणा घातला, विधानसभेत गदारोळ घातला आणि शिस्तभंगाची कारवाई झाली त्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सहानुभूती दाखवली आहे आणि त्यांचे अधिकार, लोकशाही आणि स्वातंत्र्याबाबत जे मत व्यक्त केलं आहे तो अधिकार आमच्या १२ आमदारांना का नाही? त्यांनाही आदेश द्या,असं संजय राऊत म्हणाले.