
मुंबई – बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री सना मकबूलने रॅपर नेझीचा पराभव करत शोचे विजेतेपद पटकावले. सना मकबूल आणि नेझी टॉप 2 मध्ये होते. ग्रँड फिनालेमध्ये सनाने नेझीचा पराभव केला आणि शोची ट्रॉफी जिंकली. यासह सना मकबूलला 25 लाखांचे रोख बक्षीस देखील मिळाले आहे.
ग्रँड फिनालेमध्ये सनाबरोबर रणवीर शौरी, कृतिका मलिक, रॅपर नेझी आणि साई केतन राव हे स्पर्धक होते. रॅपर्स नेझी आणि रणवीर शौरी या सीझनचे दुसरे उपविजेते ठरले.
सना मकबूल ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ‘ईशान: सपना को आवाज दे’, ‘कितनी मोहब्बत 2’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘अर्जुन’, ‘आदत से मजबूर’, ‘विश’ या सारखे काही शो तिने केले आहेत. तसेच तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2014 मध्ये ‘दिक्कुलू चूडाकु रमैया’ या तेलुगू चित्रपटातून तिने साऊथमध्ये पदार्पण केले. या शिवाय ती ‘खतरों के खिलाडी 11’ची आणि ‘फियर फॅक्टर’ सारख्या शोची स्पर्धकही होती.