देशविदेशनवी दिल्लीराष्ट्रीय

संजीव खन्ना यांनी घेतली ५१ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ

नवी दिल्ली : सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या सेवानिवृत्तीनंतर देशाचे 51 वे सरन्यायमूर्ती न्या. संजीव शर्मा यांचा कार्यकाळ अवघा 6 महिन्यांचा असणार आहे. आगामी 13 मे 2025 रोजी ते सरन्यायमूर्ती पदावरून सेवानिवृत्त होतील. संजीव खन्ना यांचा वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायमूर्ती होते. निवृत्त सरन्यायमूर्ती चंद्रचूड यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा होता. नवे सरन्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिने असेल. आगामी 13 मे 2025 रोजी ते सरन्यायमूर्ती पदावरुन निवृत्त होतील. संजीव खन्ना यांनी 1983 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढे न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून वकिलीला सुरूवात केली.

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला‌. त्यांनी १९८३ मध्ये कायदे क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. खन्ना यांनी प्रथम दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकिलीला सुरुवात केली. घटनात्मक कायदा, कर, लवाद, व्यावसायिक कायदा आणि पर्यावरण कायदा यासह कायदेशीर क्षेत्रांत त्यांना मोठा अनुभव आहे. खन्ना यांनी प्राप्तिकर विभागाकरिता वकील म्हणूनही काम केले आहे. सरन्यायाधीश खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश देव राज खन्ना यांचे पुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एच.आर. खन्ना यांचे पुतणे आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ६ वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी ४०० पेक्षा अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या ५१ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश खन्ना यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा म्हणजे १३ मे २०२५ पर्यंत राहणार आहे. डॉ. डी. वाय. चंद्रचूड निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सरन्यायाधीश खन्ना यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपस्थित होते. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून रविवारी निवृत्त झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!