ब्रेकिंग

मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाही-उच्च न्यायालय

केरळ- केरळ उच्च न्यायालयने शुक्रवारी मॉलला पार्किंग शुल्क आकारण्याचा अधिकार नाही असं मत व्यक्त केलं आहे. न्यायालयाने हे वक्तव्य एर्नाकुलम येथील प्रसिद्ध लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलकडून मोठ्या प्रमाणात पार्कींग शुल्क घेतलं जात असल्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेबद्दल बोलताना केलंय. या प्रकरणामधील पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे.

केरळ उच्च न्यायालयाने कलामास्सेरी नगरपालिकेकडूनही यासंदर्भातील माहिती मागवली आहे. लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला पार्किंगसाठी पैसे आकारण्याचा काही परवाना देण्यात आलाय का हे महापालिकेने सांगावं, असं न्यायालयाने म्हटलंय. इमारतीच्या बांधकामाच्या वेळी पार्किंग असेल या अटीवरच बांधकामास परवानगी दिली जात असल्याने पार्किंगसाठी पैसे आकारणे चुकीचं आहे, असं मत न्यायलयाने व्यक्त केलंय.

न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी मॉल बेकायदेशीरपणे ग्राहकांकडून पार्किंगचे पैसे घेत असल्याचं मत व्यक्त केलंय. मात्र न्यायालयाने अद्याप पार्किंग शुल्क आकारणीवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले नाहीत. पार्किंग हा अनिवार्य भाग असल्याने त्यासाठी शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही असं न्यायामुर्ती म्हणालेत. म्हणजेच पार्किंग हा इमारतीचा भाग आहे, म्हणूनच त्यासाठी शुल्क आकारलं जाणं अयोग्य आहे, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!