ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री उदय सामंत ह्यांची भेट

मुंबई- बंगळूरू शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आज महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ह्यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपला आक्रोश उदय सामंत ह्यांच्याकडे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याने ह्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.या संदर्भात मंत्री उदय सामंत आणि राज्याचे नगरविकासमंत्री आणि सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही या संदर्भात चर्चा करून महाराष्ट्र एकीकरण समितीला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत ही निषेधार्ह घटना असल्याचे उदय सामंत ह्यांनी म्हटले आहे.