मुंबईमहाराष्ट्र

ठाण्यातील रस्त्यावर डुप्लीकेट संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन!

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी ठाण्यात अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठाकरे गटाने आंदोलन करताना मंत्री संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम आमदार संजय गायकवाड यांची नकल करणारे पथनाट्य सादर केले. यावेळी संजय शिरसाट यांची नकल करणाऱ्याने चक्क बॅग आणली होती. तर संजय गायकवाड यांची नकल करणारा बॉक्सिंग खेळत होता. माणिक कोकाटे यांना डिवचण्यासाठी पत्ते खेळले जात होते. त्यामुळे हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी उसळली होती.

ठाकरे गटाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सोमवारी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केले. विशेष म्हणजे या आंदोलनात वादात अडकलेल्या मंत्री आणि आमदारांची पथनाट्याद्वारे नकल करण्यात आली.
यावेळी संजय शिरसाट यांची नकल करणाऱ्याने बॅग आणली होती. तर संजय गायकवाड यांची नकल करणारे बॉक्सिंग खेळत होते. त्यांच्या एका हातात डाळीने भरलेली पिशवी तर दुसऱ्या हातात बॉक्सिंगसाठी लागणारे ग्लोज घातले होते. या ग्लोजने ते बॉक्सिंग खेळत होते. माणिक कोकाटे यांचा विरोध म्हणून पत्ते खेळले जात होते. योगेश कदम यांच्यावरही डान्स बारच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आली. हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. संजय गायकवाड यांची नकल करणारे बॉक्सिंग खेळत होते. त्यांच्या एका हातात डाळीने भरलेली पिशवी तर दुसन्या हातात बॉक्सिंगसाठी लागणारे ग्लोज घातले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!