किल्ले रत्नदुर्गच्या साक्षीने गुढीपाडवा! गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम!
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान (रत्नागिरी विभाग) यांच्यातर्फे ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, मेघा कोल्हटकर, मिलिंद कोल्हटकर, यंग इन्स्पिरियटर्स नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष साहिल गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी ९ वाजता पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील
गड-किल्ल्यांवर हा सोहळा साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्यावर गुढी उभारून, भगव्या अभिमानाने हा दिवस सोहळ्याच्या स्वरूपात साजरा करूया,” असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले. त्यानुसार राज्यात सर्वत्र किल्ल्यांवर गुढी उभारण्यात आली. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या दीपेश विठ्ठल वारंग, मानसी सुभाष चव्हाण, तन्मय जाधव, मयूर भितले भूमिका सुरेंद्र चंदरकर, सलोनी मिलिंद सुर्वे, सानिया राहुल पवार, प्रीतम मांडवकर, सेजल भार्गव मेस्त्री, शुभम आग्रे, सुमित कदम, आदित्य कांबळे, समृद्धी चाळके, अंकुर मांडवकर, शुभांगी शशिकांत जाधव, शशिकांत नारायण जाधव या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.