कोंकणमहाराष्ट्र
कोकणात देवरुख संगमेश्वर मार्गावर सापडले खवले मांजर!

रत्नागिरी:-देवरुख संगमेश्वर मार्गावर कोसुंब मार्गावरून ये जा करणाऱ्या एका ग्रामस्थाला कोंसूब घाटी येथे मंगळवारी सकाळी खवले मांजर दिसून आले. हा प्रकार ग्रामस्थांना कळताच खवले मांजर ला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन खवले मांजराला ताब्यात घेतले. या खवले मांजराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.
यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनपाल मुल्ला यांनी दिली आहे. दोन वर्षे वाढीचे, मादी जातीचे हे खवले मांजर होते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.