मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार,पालिकेचा निर्णय

मुंबई:- वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबईतील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान पहिली ते आठवीच्या शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. हा नियम मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे.
सध्या राज्यात कोरोना बाधितांचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवली आहे.याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.इकबाल चहल यांनी एका माध्यमाशी संवाद साधत असताना,मुंबईतील कोरोना बाधितांपैकी ८० टक्के रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती दिली आहे.
हा ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यंदा ३ वेळा शाळा सुरू करून बंद कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहेत.अश्यातच पुन्हा एकदा ओमायक्रॉनने शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.