मुंबईकोंकणमहाराष्ट्र

रत्नागिरीत उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघावर फडकणार भगवा - पदाधिकाऱ्यांनी दिला विश्वास

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नरबे लाजूळ गावच्या उबाठा गटाचे शाखा प्रमुख संतोष घाणेकर, गट प्रमुख राजेंद्र भोसले, अनिल शितप, दत्ताराम भोसले, मंगेश भोसले यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पर्श्भूमीवर रत्नागिरी तालुक्यात पक्षप्रवेशाची श्रुंखला सुरू असून, नरबे लाजूळ गावच्या उबाठा गटातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. उबाठा गटात निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपेक्षेमुळे आणि आयारामच्या राजकारणाचा विरोध करत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. यावेळी मंत्री उदय सामंत यांचे विकास कार्य पाहून आाज शिवसेनेत प्रवेश करत आहे. उदय सामंत यांच्या नेतृत्वात रत्नागिरीचा विकास जोरदार होत आहे यापुढेही होईल असा ठाम विश्वास उबाठाचे शाखाप्रमुख संतोष घाणेकर यांनी व्यक्त केला. तर या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना बहुमताने विजयी करणार असल्याचं गटप्रमुख राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख महेश देसाई म्हणाले, “नरबे लाजूळ गावच्या उबाठा गटातील नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश ही पक्षाच्या ताकदीत भर आहे. आम्ही सर्व मिळून रत्नागिरी -संगमेश्वर मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकवू या प्रसंगी विभाग प्रमुख महेश देसाई, प्रविण पांचाळ, उपविभागप्रमुख योगेश मुकादम विश्वास घेवडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!