मंत्रालयमहाराष्ट्र

मंत्रालयातील चेहरा पडताळणी व्यवस्था बंद करावी, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळावा काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर इतके आरोप होता असताना सरकार कारवाई का करत नाही? वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल

मुंबई, दि. ५ – मंत्रालयात प्रवेशासाठी आता चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी ही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीतर सामान्य जनता मंत्रालयात मंत्री, सचिव यांना भेटण्यासाठी, आपल्या व्यथा मांडण्यासाठी येतात. पण महायुती सरकारला जनतेची भीती का वाटते? मंत्री,सत्ताधारी आमदार यांच्या जवळचे कंत्राटदार, दलाल यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळतो पण शेतकरी, मजूर , सामान्य जनतेला मात्र प्रवेश करता येऊ नये अशी व्यवस्था उभी केली आहे हे अन्यायकारक असल्याने ही व्यवस्था बंद करण्यात यावी अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवरच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. सत्ताधारी आमदार प्रश्न उपस्थित करत असताना याची चौकशी करू इतके औदार्य सरकार दाखवत नाही. याचा अर्थ तुम्हीही काहीही करा, कितीही आरोप झाले तरी कारवाई होणार नाही अशी बेशरमीची भूमिका सरकारने घेतल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. संतोष देशमुख प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याचा फोन अजूनही का सापडत नाही, महाराष्ट्र पोलीस इतके कमजोर झाले आहेत का की एक मोबाईल त्यांना शोधता येत नाही? हा मोबाईल सापडला की दूध का दूध पानी का पानी होईल असं वडेट्टीवार म्हणाले.

एकीकडे धान, सोयाबीन शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. शेतकरी ठिबक सिंचनाचे अनुदान थकले आहे, मनरेगाचे गेले सहा महिने पैसे दिले नाही त्यामुळे गडचिरोली मध्ये कामगाराने आत्महत्या केली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना देखील भत्ते दिले गेले नाही.त्यांना सावत्र वागणूक दिली जात आहे. राज्य सरकार कंगाल झाल्याने सर्व घटकांवर अन्याय केला जात आहे अशी टीका ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातील अश्या अनेक मूलभूत प्रश्नावर लक्ष हटवण्यासाठीच मंत्र्यांमध्ये मतभेद, वाद असे चित्र निर्माण करत असल्याचे ही वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!