
मुंबई:दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस वे ने कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी मिळाली आहे. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंची यांनी टोल माफीची घोषणा केली आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन असेल. खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस, अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी आज बैठक झाली. कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा आज निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती ते रहात असलेल्या नजीकच्या पोलीस स्थानकात दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जातील. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी आणि विसर्जनाच्या 2 दिवसा नंतर पर्यंत ही सेवा असेल.
गणेशोत्सवाच्या ऐन हंगामात टोल नाक्यांवर वाहनांची मोठी रांग लागलेली असते. मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे ने कोल्हापुरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मिळाली आहे.