आंदोलनस्थळी महिलेची प्रसूती प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल
घरकुल देण्याच्या आश्वासनानंतर आदिवासी पारधी समाजाचे आंदोलन मागे

बीड:- घरकुल मिळावे या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर गेल्या नऊ दिवसापासून आदिवासी कुटुंबाचे ठिय्या आंदोलन सुरू होते. यादरम्यान आंदोलनकर्त्या एका गर्भवती महिलेची प्रसूती देखील झाली होती.अश्या अवघड परिस्थित देखील गर्भवती महिलेला आंदोलन करायची वेळ आली हे पाहून याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली.
महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलन करणाऱ्या कुटुंबाची भेट घेतली.तसंच संबंधित कुंटुंबाला त्यांनी प्रशासनाकडून घरकुल देण्याचे आश्वासन दिले.हे मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान ठिय्या आंदोलन करताना आंदोलनकर्त्या एका गर्भवती महिलेची प्रसूती होणं हा मुद्दा राज्य पातळीवर गांभीर्याने घेतला गेला.माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित कुंटुंबाला आसरा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.