ब्रेकिंग
*चांदिवली मध्ये शिवसेना आमदाराने घातली नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराला कचऱ्याची आंघोळ, पहा व्हिडियो…*

मुंबई ।मुंबईतील नालेसफाईवरून विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे. नालेसफाई केल्याचा पालिकेचा दावा कसा फोल ठरला आहे आहे हे विरोधक वारंवार सांगत आहे. नालेसफाईवरून वाद सुरू असताना शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी पालिकेच्या नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराला चक्क नाल्यात बसवून अंगावर कचरा टाकला. याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
चांदीवली मधील संजय नगर भागात मोठ्या प्रमाणत नाले तुंबलेले होते. या बाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर स्थानिक आमदार दिलीप लांडे हे त्या ठिकाणी गेले होते.
पहा हा व्हिडियो..