
डोंबिवली: गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.ही सेवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमानी मेटाकूटीला आले आहेत. यंदाच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढवले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी आप्तस्वकीयांसोबत गणोशोत्सव साजरा करण्याकरीता जाण्यासाठी कोकणवासीय चाकरमान्यांची प्रचंड ओढ आहे. महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळून मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणोशोत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता डोंबिवलीतून मोफत बस सेवा दिली जाणार आहे.
इच्छुकांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक,संतोष चव्हाण, सागर जेधे यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षीत करण्यासाठी ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.