महाराष्ट्रकोंकण
निलेश राणेंना वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विशेष भेट!

सिंधुदुर्ग : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली. यावेळी उदय सामंत ह्यांनी आ. निलेश राणे ह्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू म्हाप यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी उदय सामंत ह्यांनी आमदार निलेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.