धक्कादायक! रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाने केला बलात्कार

पुणे- पुण्यामधून माणुसकीला काळीमा फासणारी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या हडपसर तेथील रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबधित मुलीजवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते, त्याचाच फायदा घेऊन संबंधित रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका सुनसान जागी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्या प्रकार घडला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. सबंधित घटना 5 जानेवारी रोजी घडल्याचं समोर येत आहे. अटक केलेल्या आरोपींची नावं सागर बिभीषण बचुटे, विकी कुमार पासवान आणि अशोक विर बहादुर थापा अशी असून पीडित मुलीचं वय अवघं १६ वर्ष आहे.
संबधित मुलगी ही नेपाळहून २० दिवसांपूर्वी भारतात नोकरीच्या शोधात आली होती. दरम्यान ५ जानेवारीला रात्री ती रिक्षातून तिच्या मैत्रीणीसोबत सागर बचुटे याच्या रिक्षातून प्रवास करत असताना त्या दोघींकडे पैसे नसल्याचा फायदा घेत आरोपी सागरने त्याच्या मित्रांसोबत मिळून तिचा बलात्कार केला. तिची मैत्रीण यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान त्यानंतर पीडित मुलीबरोबर तिच्या मैत्रीणीने हडपसर पोलिसांत जाऊन तक्रार केली. या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






