महाराष्ट्रमुंबई
रौप्यमहोत्सवी प्रदीर्घ सेवेबद्दल सौ. रिंकू दवे सन्मानित ; दहिसरच्या पूर्णप्रज्ञा एज्युकेशन ट्रस्टने केला गौरव

मुंबई : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा एज्युकेशन ट्रस्ट च्या विद्यमाने येथील संगणक विभाग प्रमुख सौ. रिंकू भावेश दवे यांना त्यांच्या रौप्यमहोत्सवी प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन व्यवस्थापनाने सन्मानित केले. पूर्णप्रज्ञा अध्यक्ष ईशप्रिया तीर्थ स्वामिजींनी सौ. रिंकू दवे यांना सन्मानित केले. पूर्णप्रज्ञा एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन लक्ष्मी आचार्य, कोषाध्यक्ष एन आर राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वजन उडूपा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सौ. रिंकू दवे यांनी सुमारे २९ वर्षे या संस्थेत सेवा बजावली आहे. या परिसरात विविध सामाजिक उपक्रमात त्या हिरीरीने भाग घेत असतात. त्यांच्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.