कोंकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

डॉ. स्नेहा राणे यांच्या बाळभूक मराठी कादंबरीचे प्रकाशन; कादंबरी लेखनासाठी ऊर्जा मिळाल्याचे कवी अरुण म्हात्रे यांचे उद्गार

मुंबई : मालवणी भाषेत काव्यसंग्रह प्रकाशित झालेल्या डॉ. स्नेहा राणे यांच्या ” बाळभूक ” या पहिल्या मराठी कादंबरीचा प्रकाशन नुकताच बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या स्वतःच्या आणि डॉ. स्नेहा राणे यांच्या कवितांचे खुमासदार शैलीत वाचन करून आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मालवणी भाषेचे गोड कौतुक केले. डॉ. स्नेहा राणे यांनी काव्य, नाट्य आणि आता कादंबरीचे लेखन केल्याने मलाही कादंबरी लेखनासाठी ऊर्जा मिळाली आहे. लोकसत्ताचे माजी उपसंपादक मधु कांबळे यांनी बाळभूक कादंबरीचा अत्यंत योग्य शब्दात आढावा घेतला. कादंबरीचा शेवट जाणून घेण्यासाठी सर्वांना बाळभूक कादंबरी वाचण्याचे आव्हान केले. लेखिका डॉ. स्नेहा राणे यांनी कादंबरीची लेखन प्रक्रिया व काव्य प्रतिभा मालवणी सारख्या गोड भाषेमध्ये कथन केली.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पुण्यनगरीचे संपादक विशाल राजे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे या मान्यवरांनी बाळभूक या कादंबरीचे गोड शब्दात कौतुक केले. प्रकाशन सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन सौ. पूजा काळे यांनी केले तर बंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व निमंत्रक समीर राणे यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी लकीड्रॉच्या माध्यमातून ६५ प्रेक्षकांना बाळभूक या कादंबरीचे मोफत वाटप केले. प्रकाशन सोहळ्याला सभागृहात पुरुष व महिलांची खूप गर्दी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!