ब्रेकिंग

लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील – नितिन गडकरी

उत्तरप्रदेश- केंद्रातील सर्वात प्रभावी आणि आपल्या नवीन विकास योजनांमुळे सतत चर्चेत असणारे केंद्रीयमंत्री यांनी पुन्हा एक घोषणा केली आहे.रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन दिले.

रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन नितीन गडकरींनी दिले. एवढंच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही गडकरींनी म्हटलं. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीन गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली.

यावेळी त्यांनी सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलं आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेत म्हटले की, प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हायड्रोजन इंधनाचा वापरही आता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या मदतीने तयार करण्यात येणारा इथेनॉलचा वापर वाहन इंधनात करण्यात येईल. त्यामुळे पेट्रोलची किंमत ११० रुपयांहून ६८ रुपयांपर्यंत येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!