वळूया आपल्या प्राचीन संस्कृती कडे;सोपान ग्रीन गणेशा संगे !
पर्यावरण पूरक लाल मातीच्या गणेश मुर्ती,करतील निसर्गाचे संवर्धन..

आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या कोकणाला महापुराचा मोठा फटका बसला… आणि अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. गावेच्या गावे डोंगर कोसळल्याने गाडली गेली. आणि सगळीकडेच निसर्गाच्या तडाख्याची चर्चा सुरु झाली. माणसाने आपल्या हव्यासापोटी निसर्गाचे जे नुकसान केले आहे, त्याची ही निसर्गाने केलेली परतफेडच आहे.
खरेतर आपली मूळ संस्कृती ही कृषिप्रधान व ऋषी मुनींची संस्कृती आहे त्यामुळे आपले सर्व उत्सव हे पर्यावरणाशी म्हणजे शेतीशी तसेच ऋतू काळाशी निगडितच आहेत.
आपल्या पूर्वजांनी मोठ्या कल्पकतेने सण ,व्रतवैकल्यांची आखणी केलेली दिसते. भाजणी,नांगरणी व पेरणी ची कामे आटोपली कि भरपूर पीक मिळावं म्हणून किंवा मोकळा वेळ सार्थकी लावावा म्हणून श्रावण मास,गणेश चतुर्थी,नवरात्र असे अनेक सणवार साजरे करण्याची प्रथा आपल्या ऋषिमुनींनी घालून दिली आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन म्हणजेच शेतातल्या मातीपासून तयार केलेल्या या गणेश मूर्तीचे पूजन करण्याची अति प्राचीन प्रथा आहे.म्हणजे निसर्गातला घटक घेऊन निसर्गातच पुन्हा विलीन करण्याची संकल्पना आहे.
मातीला आपल्या संस्कृतीमध्ये आई म्हटलं जातं आणि निसर्गाला देव,त्यामुळे गणेशोत्सव सुद्धा निसर्गाशी तादात्म्य साधून साजरा करण्यामागे ऋषी मुनींची मानव जातीच्या कल्याणाचीच संकल्पना आहे.
शास्त्र
शास्त्रांमध्ये अशी आख्यायिका आहे की देवी पार्वतीने आपल्या मळापासून म्हणजेच मातीपासुन बालकाचा पुतळा तयार केला व आपल्या दिव्यशक्ती द्वारे त्यामध्ये अपरंपार,अलौकिक,तेज:पुंज चैतन्य भरले,अशाप्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला.
गणेश चतुर्थीला सुध्दा गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव म्हणजे मातीच्या मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते.
पार्थिव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व उत्तर पूजा यामागे साधुसंतांनी सांगितला अर्थ*
पार्थिव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व उत्तर पूजा यामागे असा अर्थ साधुसंतांनी सांगितला आहे की,
घट घट मे राम समाया
याठिकाणी घट म्हणजे मातीचा.म्हणजे मानवी शरीर.
मानवी शरीर पंचमहाभूतांनी म्हणजे आकाश (Space) , वायु (Quark), अग्नि (Energy), जल (Force) तथा पृथ्वी (Matter) – या पाच तत्वांनी
बनलेला जड/अचेतन आहे. आत्मचैतन्यामुळे तो सजीव होतो. शरीर हे हाडामांसाचे बनलेले आहे.म्हणजेच शरीर मातीतुन तयार होते व पुन्हा माती मध्येच मिसळते. चैतन्य आत नसेल तर देहाचा काय उपयोग आहे ? चैतन्यामुळे देह टवटवीत रहातो.
देहात आत्मा आहे. तेजोरूपाने, वायुरूपाने, प्रवाहरूपाने, उष्णतेचे रूपाने आत्मा हा देहात भरून राहिलेला आहे. देह हे आत्म्याचे कव्हर आहे. देह म्हणजे आत्मा नव्हे. तांब्याची तार म्हणजे वीज नव्हे. तार हे विजेचे माध्यम आहे.
आत्म्यामुळे देह चालतो, हालचाल करतो. पण हा आत्मा अदृश्य आहे. अनेक अदृश्य गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. उदा. अदृश्य वाफ इंजिन चालविते. वाफ दिसत नाही, पण वाफेमुळे इंजिन चालते. प्रकाश हा अदृश्य आहे, पण प्रकाशामुळेच दिसत असते. मन अदृश्य आहे, पण त्याचेवर मानसशास्त्र आहे. परंतु अदृश्य आत्मा हा देह चालवितो, आत्म्यामुळे देह चालतो असे म्हटले की आपल्याला पटत नाही; आपल्याला त्याबद्दल शंका येते. पण ते खरे आहे. आत्मा आहे तोवर देहाला किंमत आहे. आत्मा गेला की शरीराला कोण विचारतो ?
शरीर हे नाशवंत आहे. याउलट चैतन्य हे अमृत आहे; त्याला नाश नाही. शरीर संपले, नष्ट झाले, तरी चैतन्य असतेच. चैतन्याला अंत नाही.
परंतु ज्यावेळी जीव या शरीरात येतो, तेव्हा तो चैतन्याला विसरतो. शरीरामुळे दृश्याचे आकर्षण; दृश्यामुळे शरीराचे आकर्षण.जीव चैतन्याला विसरतो. पृथ्वी अस्थिर आहे पंचमहाभूते अस्थिर आहेत त्यामुळे शरीर व मन सुद्धा अस्थिर आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे मनुष्याला दुख:चा भोग होतो व दुखा: मुळे मनुष्य चिंतेच्या तावडीत सापडतो.चिंतेमुळे मनुष्य शरिर व मनाने हतबल होतो. देहाशी समरस व्हायची साधना करावी लागत नाही; चैतन्याशी समरस होण्यासाठी म्हणजे आनंदाचा अनुभव घेण्यासाठी मात्र साधना करावी लागते.चित्ताला स्थैर्यता येणे म्हणजेच जीवनात स्वास्थ्य मिळणे आहे.
आत्मसुख आपल्यातच आहे. फक्त ते सुख उपभोगण्यासाठी दृष्टि प्राप्त व्हावयास हवी आणि ही दृष्टि प्राप्त होण्यासाठी सद्गुरुकृपेची आवश्यकता आहे.याकरिता सद्गुरुंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये चैतन्य रूपाने वास करणाऱ्याच श्रीगणेशाला भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मातीच्या मूर्तीमध्ये आवाहन व प्राणप्रतिष्ठा केली जाते,जेणेकरून काही काळ त्याच्याशी रममाण होऊन हसत खेळत संवाद साधु शकु.त्यानंतर त्याला प्रार्थना केली जाते की तू जिथून आला आहेस तिथे म्हणजे आपल्या स्वरूपात पुन्हा विलीन व्हावे व त्यानंतर त्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते यातून आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही तो चराचरात म्हणजे आपल्यात सुद्धा आहे.
पूजन व ध्यानाच्या योगे करून आपल्यातलाच गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.
पर्यावरण पूरक लाल मातीची गणेश मुर्ती-
वळत आहोत.त्यामुळे गणेशोत्सव सुद्धा आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेले शास्त्र आणि कृषिप्रधान संस्कृती कडे वळुन निसर्गातल्या लाल मातीची गणेश मुर्ती बनवुन पुन्हा त्या मातीला निसर्गातच समाविष्ट करुन पर्यावरणाला हानी न पोहचवता गणेश उत्सवा मधे बदल घडवुन आणण्याची वेळ आली आहे.
वरिल सर्व माहिती वरुन गणेशोत्सव न निसर्गाचा अतूट संबंध आहे हे स्पष्ट होते. करिता आम्ही SOPAN GREEN GANESHA तर्फे “आपली माती आपला बाप्पा” हि संकल्पना राबवित आहोत.
याकरता आपल्या निसर्गातला घटक,लाल मातीची गणेश मुर्ती आम्ही तयार करत आहोत.या मुर्ती घरी विसर्जन करता येतात व त्यातील माती वापरुन झाड लावल्यास बाप्पा आपल्या सोबत आनंद रुपाने राहुन यश प्रदान करतील अशी माझी भावना आहे.
– मंगेश मधुकर मोरे
सोपान ग्रीन गणेशा
* आपली माती आपला बाप्पा *
इको फ्रेण्डली गणेशाच्या मूर्ती.
आता वेळ आली आपल्या मुळ संस्कृतीकडे परत वळण्याची.
सोपान उद्यम 9082973886
www.sopanudyam.com
मालाड (वेस्ट), मुंबई – 400064