नवी दिल्ली

नितीन गडकरी आणि आमदार किरण सामंत यांची दिल्ली येथे विशेष बैठक

भेटीत लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या अडथळ्यांवर सविस्तर चर्चा

नवी दिल्ली:राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्या बाबत तसेच सीआरएफ फंडातून पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरू असणाऱ्या विविध समस्या आणि भूसंपादन संदर्भात आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.

यावेळेस तात्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळवून देऊ असा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार किरण सामंत यांना दिला आहे. त्याच प्रमाणे महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ज्या शासकीय विभागातील गाड्या नादुरुस्त त्यांच्या जागेमध्ये बंद पडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आवारामध्ये अडचण झाली असून त्या नादुरुस्त गाड्यांमुळे परिसरातील सुशोभित केलेली ठिकाणी अस्वच्छ दिसत आहेत. अशा गाड्यांचा लिलाव करणे किंवा स्क्रॅप मध्ये काढण्यासाठी आपण निर्णय घ्यावा असेही विनंती आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना केली आहे. विशेष म्हणजे मतदार संघातील हर्चे बेनगी, कोलघे कांटे, विलये गोवळ पुलांची सी आर एफ फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता त्यांनी तात्काळ त्या पुलांच्या फंडासाठी मान्यता दिली आहे.

लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी ही निधीची मागणी यावेळेस करण्यात तसेच रत्नागिरी शहरातील वाहतूकिसाठी इलेक्ट्रिक मिनीबसची सुद्धा मागणी यावेळेस आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडे केली आहे. आमदार किरण सामंत यांनी केलेल्या मागण्या मंजूर करणार असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!