
मुंबई:गेल्या सुमारे ५ महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन काल उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आक्रमक झाले. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थाना बाहेर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेल करण्यात आली. तसेच, शरद पवार आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक केली. यावेळी निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. अचानकपणे झालेल्या या आंदोलनासमोर पोलिसही हतबल झालेले पाहायला मिळाले.
आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला आहे. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.आज संपकरी कर्मचारी अतिशय अक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलण्यासाठी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलण्यास तयार असल्याचे प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, सर्वांनी शांत राहावे. कुणीही दगडफेक आणि चप्पलफेक करू नये. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे, त्यांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. मी सर्वांचे म्हणने ऐकलाय तयार आहे फक्त त्यांनी शांत रहावे.तसेच त्यांनी आवाहन केले आहे