सर्वपित्रीच्या विधिमुळे यंदाही बाणगंगा तलावात मृत माशांचा खच; पर्यावरणप्रेमी करणार फौजदारी खटला!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला असून बाणगंगा तलाव पुन्हा एकदा दुषित झाला आहे. पितृपक्ष आणि सर्वपित्री अमावस्येनिमित्त करण्यात येणान्या विधिनतर तलावात मृत माशाचा खच पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधिसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाण गंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या पटना घडत आहेत. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली जाहे. या संदर्भातील सर्वोच्य न्यायालयाच्या (एम. सी. मेहता गंगा प्रदूषण प्रकरण) आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१८ मधील आदेशानंतरही प्रशासनाने तलावाकाठी धार्मिक विधि करण्यावर बंदी घातलेली नाही.
दरवर्षी बाणगंगा तलावाकाठी धार्मिक विधी करण्यासाठी मोठया संख्येने भाविक येतात गेल्या काही वर्षात या तलावाची लौकप्रियता वाढल्याने दिवसेंदिवस धार्मिक विधि करायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाणगंगा तलावातील प्रदूषण रोखण्यात मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तकार करू, असा इशारा पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीचे प्रमुख रोहित जोशी यांनी दिला होता. त्यानुसार याप्रकरणी फौजदारी खटला करण्यात येणार असल्याचे रोहित जोशी यांनी सांगितले. बाणगंगा तलावात गेली अनेक वर्ष मृत माशांचा खच आढळून येतो आहे. साधारण सर्वपित्री अमावस्येनंतर ही घटना घडत असल्याचे सांगतिले जाते. त्यामुळे यापूर्वीही स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही त्यात कोणतेही बदल झालेले नाहीत परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप सर्व स्तरांतून केला जात आहे.