मंत्रालयशासकीय अध्यादेश
राज्यातील शाळांची पुन्हा वाजणार घंटा:कोविडमुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास सरकार ची परवानगी
मुंबई:शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इय़त्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आज राज्य शासनाकडून काढण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोविडमुक्त भागातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आज एक महत्वपूर्ण निर्णय़ घेतलेला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून शासन निर्णय जाहीर केला असून, करोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावाने शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासकीय मार्गदर्शक सूचना वाचा –
School education GR