ब्रेकिंग: राज्यातील ‘या’ २५ जिल्ह्यांमध्ये झाले निर्बंध शिथील, तर कोकणासह ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम !
मुंबई, ठाणे बाबत निर्बंध शिथील करण्याचे महापालिकांना अधिकार

मुंबई :राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार आहेत या अकरा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी राज्य सरकारकडून अधिकृतपणे आदेश काढण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना नियमावलीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत नसल्याने तिथे कठोर निर्बंध लागू असतील.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमावली (लेव्हल थ्री) लागू असेल.
इतर जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानं आठ वाजेपर्यंत उघडी राहतील.
शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शनिवारी दुकानं दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं उघडी राहू शकतील.तर रविवारी पूर्णतः बंद रहातील.
गार्डन आणि मैदानं व्यायामासाठी खुली असतील. नाट्यगृह व एकल तसेच मल्टिप्लेक्स चित्रपटगृहं मात्र बंदच राहतील.
मुंबई, मुंबई उपनगरं आणि ठाणेमध्येही सध्या तरी निर्बंध लागू राहतील. त्यासंदर्भातला निर्णय स्थानिक आपात्कालीन यंत्रणा प्रशासन घेईल.
सरकारी आणि खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळा विभागण्याची सूचना करण्यात आली आहे.
शेतीविषयक कामकाज, सिव्हिल वर्क, औद्योगिक काम, मालवाहतूक यांचं कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू राहील.
जिम, योग केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे वातानुकूलित यंत्रणेविना 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री आठवाजेपर्यंत सुरू राहू शकतात. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत या सगळ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
चित्रपटगृहं, नाटयगृहं, मल्टीप्लेक्स यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं बंदच राहतील.
हॉटेलं 50 टक्के क्षमतेसह दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहू शकतात. पार्सल आणि टेकअवे यांना परवानगी असेल.
रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत जाण्यायेण्यावर निर्बंध असतील.
वाचा शासकीय अध्यादेश :
ORDER-Break the Chain-Modified Guidelines 02.08.2021