मुंबईगोरेगाव मिरर

दिंडोशीच्या मानाच्या दहीहंडी द्वारे अवकाशाला गवसणी घालणाऱ्या इस्रोच्या खगोलशास्त्रज्ञांना गोविंदांची सलामी

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभु यांची स्वागतार्ह संकल्पना

मुंबई दि. ०७ (प्रतिनिधी) प्रतिवर्षी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट व कल्पतरू प्रतिष्ठान यांच्या द्वारे उभारली जाणारी मानाची दहीहंडी सर्व गोविंदांसाठी विशेष आकर्षण व मानाची असते. दिंडोशीच्या मानाच्या दहीहंडी द्वारे अवकाशाला गवसणी घालणाऱ्या इस्रोच्या खगोलशास्त्रज्ञांना गोविंदांनी सलामी दिली.

भारताने २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ यशस्वीरित्या उतरले आणि युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीननंतर असे करणारा चौथा देश बनला. लँडर विक्रमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला असून हे अतिशय अवघड मिशन यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या इस्रोच्या सर्व खगोशास्त्रज्ञांच्या यशाला सलामी देण्यासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनिल प्रभु यांच्या संकल्पनेतून या वर्षी आयोजित दिंडोशीची मानाची दहीहंडी समर्पित करण्यात आली. दहीहंडी पथकात सहभागी गोविंदा देखील एकावर एक मानवी मनोरे रचत जणू अवकाशाला गवसणी घालतात. येथे सहभागी झालेल्या प्रत्येक गोविंदाने दिलेली सलामी ही प्रत्येक खगोलशास्त्रज्ञाच्या सततच्या मेहनतीला आणि उत्तुंग यशाला दिलेली सलामी आहे.

त्रिवेणी नगर कुरार गाव येथे आयोजित दहीहंडी उत्सवात पाहिले बक्षीस रोख रुपये ५,५५,५५५/- ठेवण्यात आले होते. सायंकाळी ४ते १० या वेळेत आयोजित कार्यक्रमात स्थानिक गोविंदा पथकांसह अनेक नामवंत पथकांनी हजेरी लावली व मानवी मनोरे रचून इस्रोच्या सर्व खगोशास्त्रज्ञांच्या यशाला सलामी दिली. यावेळी स्वरसाक्षी प्रतिष्ठान प्रस्तूत सुपरस्टार ऑर्केस्ट्रा वाद्यवृंदाने बहारदार कार्यक्रम सादर केला.

याप्रसंगी आमदार सुनील प्रभू यांच्या समवेत, शिवसेना नेते अमोल किर्तीकर, उपमहापौर सुहास वाडकर, सायली सुनील प्रभू, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, विधानसभा संघटक पुजा चौहान, रीना सुर्वे, विधानसभा समन्वय आशा केणी, उपविभाग प्रमुख, गणपत वारीसे, प्रदीप निकम ,सुनील गुजर, भाई परब, उपविभाग संघटक रुचिता आरोसकर, वृंदा पालेकर, सानिका शिरगावकर, युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित सुनिल प्रभु, रुपेश कदम, माजी नगरसेविका सायली वारीसे, उपविभाग समन्वयक दत्तात्रय शिरोडकर, शाखाप्रमुख अशोक राणे, मनोहर राणे, विजय गावडे, रमेश कळंबे, संपत मोरे, मोहन परब, रामचंद्र पवार, संदीप जाधव, महिला शाखा संघटक संजीवनी रावराणे, विद्या खानविलकर, कृत्तिका शिर्के, रुपाली शिंदे, पद्मा राऊत, युवासेना विभाग अधिकारी प्रशांत मानकर यांच्यासह गोविंदा पथक आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!